E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गावरान आंब्याची आवक वाढली
Wrutuja pandharpure
21 May 2025
भावात घट; हंगाम लवकर संपणार
पुणे
: आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याची बाजारात आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. गावरान आंब्यालाही यंदा बदलेल्या हवामाचा फटका बसला आहे. त्यामुळे फळधारणा कमी असल्याने हंगाम लवकर संपणार असल्याचा अंदाज व्यापार्यांनी व्यक्त केला आहे.
मार्केट यार्डातील फळ बाजारात गावरान आंब्याची आवक वाढली आहे. बाजारात रोज १२ ते १३ टन आवक झाली आहे. परिणामी, भावात मागील आठवड्याच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत ही आवक आणखी वाढणार आहे. मात्र, पाऊसाला सुरूवात झाली आहे. हवामानातील बदलामुळे यंदा १० दिवस आधीच हंगाम संपण्याची शक्यता आहे. दरवर्षी ३० जूनपर्यंत होणारी आवक यंदा २० जूनपर्यंतच होण्याची
शक्यता आहे.
बाजारात जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, कोकणातून मानगाव भागातून आवक होत आहे. दरवर्षी साधारणपणे २० मे ला गावरान आंब्याची आवक होत असते. मात्र, यंदा ती ५ मे पासूनच सुरू झाली आहे. बाजारात रविवारी १२ ते १३ टन आवक झाली. यामध्ये हापूस, पायरी, केशर आणि बदाम आंब्याचा समावेश आहे. झालेल्या आवकपैकी ८ ते ९ टन आवक ही हापूस आणि केशरची आहे.
शेतकर्यांकडून नैसर्गिक-रित्या पिकविलेल्या आंब्याचीही मागील ४ ते ५ दिवसांपासून आवक सुरू झाली आहे. हवेली तालुक्यातील मांडवी, आगळंबे येथून सोमवारी १० ते २० डागाची आवक झाली. एका डागामध्ये ७ ते ८ डझन आंबा असतो. हापूस आणि पायरीची आवक होत आहे. हापूसल डझनाला दर्जानुसार २०० ते ३०० रुपये, तर पायरीला १५० ते २०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती गावरान आंब्याचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी दिली. बाजारात दाखल झालेल्या या मालाला चांगली मागणी असल्याचेही कोंडे यांनी सांगितले.
आणखी आवक वाढणार
गावरान आंब्याची आवक यंदा नेहमीच्या तुलनेत १५ दिवस आधीच सुरू झाली आहे. आता आवक वाढली आहे. पुढील आठवड्यात आवकमध्ये मोठी वाढ होईल. त्यानंतर दरातही काही प्रमाणात घट होऊ शकते. बाजारात दाखल होत असलेल्या आंब्याचा दर्जा चांगला आहे. या आंब्यालाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
- युवराज काची, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.
गावरान आंब्याचे एक किलोचे दर
आंबा
दर
हापूस
३० ते ७० रुपये
पायरी
३० ते ५० रुपये
केशर
३० ते ८० रुपये
बदमा
२० ते ४० रुपये
Related
Articles
शेअर बाजार घसरला
31 May 2025
युपीएससीमध्ये शिवांश जागडे राज्यात दुसरा
29 May 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
युपीएससीमध्ये शिवांश जागडे राज्यात दुसरा
29 May 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
युपीएससीमध्ये शिवांश जागडे राज्यात दुसरा
29 May 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
युपीएससीमध्ये शिवांश जागडे राज्यात दुसरा
29 May 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
असीम मुनीरच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
29 May 2025
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय